Saturday, December 11, 2021

Nainital Jim Corbett tour with Veena World भाग 1: नोएडा, अक्षरधाम दिल्ली

22oct21 

Nainital Jim Corbett tour with Veena World

भाग 1: नोएडा, अक्षरधाम दिल्ली

 

सकाळी 10.40 ला आम्ही सचखंड एक्सप्रेस ने परभणीहून दिल्लीला जाण्यासाठी निघालो. स्टेशनवर आम्हाला टाटा बाय-बाय करण्यासाठी काही मित्र आले होते. 

गाडी अगदी वेळेवर निघाली. प्रवासात आमच्या शेजारी एक सरदारजी, त्यांची बायको, आई आणि छोटा तीन वर्षाचा मुलगा होता. त्याचे नाव होते गुरनुर सिंग. आम्ही निघाल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पोहोचेपर्यंत त्यांचे सारखे खाणे चालू होते. छोटा गुरनुर सिंग खूप मस्तीखोर होता. त्याचे खेळणे, वाकुल्या दाखवणे सारखे चालूच होते. त्याच्या सोबत खूप मस्ती केली. कोरोनाच्या साथीमुळे मागील दोन वर्षात आम्ही रेल्वेने प्रवास केला नव्हता. रेल्वेच्या डब्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे आढळून आले. Washroom ची व्यवस्था, सुधारणा व्यवस्थित होती. 

कोरोनाच्या साथीमुळे रेल्वेने सध्या AC coach मध्ये अंथरूण-पांघरूण देणे बंद केले होते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 Oct 21ला सकाळी 11 वाजता आम्ही हजरत निजामुद्दीन स्टेशन वर पोहोचलो. तिथून NOIDA ला दादाच्या घरी जाण्यासाठी लोकल टॅक्सी करावी लागली. कारण सध्या कोरोनामुळे ओला, उबेर कंपनीने दोनच्या वर पॅसेंजर घेणे बंद केले होते.

फ्रेश होऊन दुपारी आम्ही अक्षरधाम पाहण्यासाठी निघालो. मेट्रो रेल्वेने प्रवास करून तेथे सायंकाळी चार वाजता पोहोचलो. मेट्रो रेल्वे पूर्ण AC असते. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर (Concourse) जाण्यासाठी लिफ्ट होती. प्लॅटफॉर्म वरील आणि मेट्रो मधील स्वच्छता वाखाणण्याजोगी होती.




अक्षरधाम मंदीर हे भारतातील प्रसिध्द मंदीर आहे. हे दिल्लीतील एक प्रमुख आकर्षण मानले जाते. दिल्लीत येणारे 70% पर्यटक अक्षरधाम मंदिरात नक्कीच येतात.

हे जगातील विशालकाय मंदिरापैकी एक आहे, यास स्वामीनारायण मंदिर असेही म्हणतात. याचा विशालकाय आकार स्वतःमध्ये एक आदर्श मानल्या जातो.

या मंदिरामध्ये मोबाईल, कॅमेरा व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत घेऊन जाता येत नाहीत. त्यामुळे आम्ही त्या वस्तू बाहेर काउंटरवर जमा केल्या. त्यालासुद्धा मोठी रांग होती. Security check झाल्यानंतर आम्ही आत गेलो. तेथील सुंदर आणि स्वच्छ परिसर पाहिला. मन प्रसन्न झाले आणि भारावून गेले. 

पुढे गेल्यावर भव्य मंदिर दिसले. हे मंदिर 141 फुट उंच व 316 फुट रूंद आणि 350 फुट लांबीचे आहे. 

या मंदिरास मुख्यतः राजस्थानी गुलाबी दगडांनी व त्याचे चटईक्षेत्र पांढऱ्या इटालीयन मार्बल ने बनवले आहे. 

मंदिराच्या मध्यभागी विशाल घुमटाखाली 11 फुट उंचीची स्वामीनारायण भगवानांची अभयमुद्रामधील बैठी मुर्तिही आहे. स्वामीनारायण मंदिरातील प्रत्येक मुर्ती ही पंच धातुंनी बनलेली आहे. या मंदिरात राम सीता, राधा कृष्ण, शिव पार्वती आणि लक्ष्मी नारायण यांच्या मुर्त्या ही स्थापीत केल्या आहेत.

मंदिराच्या खालच्या भागात गजेंद्र पीठ आहे तसेच हत्तीस श्रध्दांजली देणारा एक स्तंभ ही आहे. या गजेंद्र पीठामध्ये पौराणिक कथांमध्ये आलेले हत्तीसंबंधी प्रसंग कोरलेले व गुलाबी दगडांनी बनविलेले आहेत. तसेच हत्ती चे विविध गुण, ते पर्यावरणासाठी कसे उपयोगी ठरतात हे पटवून दिले आहे. 

आम्ही यानंतर रात्री सव्वा सात वाजता होणारा वॉटर शो बघितला.

कारंजे, लाईट्स आणि संगीत यांचे मिश्रण असलेला हा अनोखा कार्यक्रम असतो. मधोमध अनेक प्रकारचे कारंजे आणि त्याच्या चहूबाजूंनी उतरत्या पायऱ्या अशी रचना असते. जवळपास सहा हजार लोकांनी एकदाच हा वॉटर शो बघितला. 

यावेळी वॉटर शो ची थीम होती- केनोपनिषद मधील एक कथा.

लहान मुले कारंजाभोवती बागडत असतात. वरूणदेव, अग्निदेव, वायूदेव, सूर्यदेव, इंद्रदेव हे सर्वजण क्रमाक्रमाने त्या कारंज्याचे बनलेले फुल मिटविण्याचा प्रयत्न करतात परंतु मुले निरागस असल्यामुळे त्या कारंज्याचे फुल मिटत नाही.

या वॉटर शो मध्ये लेझर किरणांचा वापर करून समोरील भिंतीवर वरील देवतांच्या आकर्षक चलीत प्रतिमा तयार केल्या जातात. तसेच हे कारंजेही विविधरंगी आकर्षक दिसतात. त्याचबरोबर सुंदर अशा संगीताची जोडही असते.

शेवटी भव्य अशा स्वामी नारायणाच्या मूर्तीची आरती केली जाते.



येथील सुखद असे अनुभव घेऊन आम्ही परत निघालो.

 अक्षरधाम मध्ये दोन महिन्यांच्या बाळापासून 85 वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेक व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्ती सुद्धा आलेले पाहिले.


--------------------------------------------------------------------------------------------



1 comment:

  1. The Schick Quattro Titanium - T-Max
    The Schick Quattro titanium tv apk Titanium is titanium engine block a stainless steel, titanium bolts open mens black titanium wedding bands tooth comb design. The handle hypoallergenic titanium earrings is approximately 2 inches long and 2 inches wide.

    ReplyDelete