Saturday, December 11, 2021

Nainital Jim Corbett tour with Veena World भाग2: दिल्ली ते भीमताल प्रवास

 

24 Oct 21

Nainital Jim Corbett tour with Veena World

भाग2: दिल्ली ते भीमताल प्रवास

 

आजपासून आमचा वीणा वर्ल्ड टूर कंपनीसोबत प्रवास सुरू होणार होता. त्यासाठी आम्हाला दिल्ली एअरपोर्टवर जायचे होते. 

पहाटे सव्वा सहा वाजता टॅक्सीने निघालो. दिल्लीमधील सुंदर आणि स्वच्छ असे रस्ते आणि सकाळची ट्राफिक कमी असलेली वेळ त्यामुळे आम्ही खूप लवकर पोहोचलो.



आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो तर तेथे आमचे टूर मॅनेजर श्री अमोल पाटील आधीपासूनच हजर. तसेच आमच्या सोबत असलेले सहप्रवासी श्री नितीन सर आणि स्वाती मॅडम हे दोघेही तेथे आले होते. तेथे त्यांचीही ओळख झाली. साधारण सत्तरीतले असलेले नितीन सर आणि त्यांच्यासोबत साठीतल्या त्यांच्या पत्नी स्वाती मॅडम हे दोघेही पुणेरी जोडपे उत्साही वाटले.

यासोबतच अजून दोन फॅमिली आमच्यासोबत होत्या.


एअरपोर्टवरील वांगो रेस्टॉरंटमध्ये आम्ही ब्रेकफास्ट घेतला आणि बसमध्ये बसलो. बसमध्ये बसताना अजून एका छोटीची ओळख झाली. तिला नाव विचारले तिचे नाव होते 'किमया'. 

बस सुरू झाल्यानंतर अमोलने (टूर मॅनेजर) टूरचा श्रीगणेशा केला.

गणपती बाप्पा मोरया...

मंगलमूर्ती मोरया...

उंदीर मामा की जय....

चुचुंद्री मामी की जय...

अर्थातच शेवटची घोषणा त्याने स्वतः जोडलेली.

किमया सोबत अजून एक छोटा मुलगा आमच्या सोबत होता त्याचे नाव होते 'नेक'.

या छोट्यांना घोषणा देण्यामध्ये मजा वाटली. अर्थात आम्हालाही मजा आलीच.

त्यानंतर आम्ही एकमेकांचा परिचय करून घेतला. 27 सीटर गाडीमध्ये आम्ही फक्त 14 जण होतो. बालकांपासून वृद्धांपर्यंत, गृहिणी पासून आयटी प्रोफेशनल पर्यंत, विद्यार्थी, संगीत तज्ज्ञ, डॉक्टर, योगशिक्षक अशा सर्वांचा मिळून आमचा छान ग्रुप तयार झाला. 



वीणा वर्ल्ड कडून आम्ही लवकर नोंदणी केल्यामुळे आम्हाला पुढच्या सिट्स मिळाल्या. 

जाताना गढमुक्तेश्वर येथे गंगास्नान घाट बघितला. 

नंतर गजरौला येथे बिकानेरवाला हॉटेलमध्ये दुपारचे जेवण केले. बिकानेरवाला चा दर्जा उत्तम असतो. 

पुढे मोरादाबाद रामपूरमार्गे प्रवास झाला.

चार वाजता बिलास्पुर जवळ सत्कार हॉस्पिटॅलिटी धाब्यावर चहा घेतला. या धाब्याच्या बाजूला छानसे लॉन होते. येथे स्वच्छताही होती आणि एसी वॉशरूम सुद्धा होते.

इथून निघून आम्ही रामनगर मार्गे हलद्वानी नंतर काठगोदाम येथे पोहोचलो.

 सायंकाळी पावणे सहाला पूर्ण अंधार झाला होता आणि जाणारा रस्ता पूर्ण घाटाचा होता. दोन दिवसांपूर्वीच या भागात पूर परिस्थिती झाल्यामुळे रस्त्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. आणि रस्ता मोकळा करण्याचे काम चालू होते. अनेक ठिकाणी खूप अरुंद रस्ते होते आणि जाणारी आणि येणारी वाहतूक चालू होती त्यामुळे अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झाले. ड्रायव्हरची खरेच कमाल होती खूप अरुंद रस्त्यावरून बस चालविणे. जिथे आपल्याला वाटते की एवढ्या जागेतून कार सुद्धा जाणार नाही अशा ठिकाणाहून त्यांनी मोठी बस सफाईदारपणे चालविली. आम्ही समोरच बसलेलो असल्यामुळे आम्हाला याची जास्त जाणीव झाली. 


रात्री साडेसात वाजता आम्ही भीमताल येथील The Prince Residency या 4 star हॉटेलवर पोहोचलो. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून बरेच उंच असल्यामुळे आणि थंड हवा चालू असल्यामुळे बरीच थंडी वाजत होती.

हॉटेलमध्ये आमचे स्वागत झाले. वेलकम ड्रिंक म्हणून लीची ज्यूस आणि बुरान ज्यूस देण्यात आला. नंतर आम्हाला रूम देण्यात आल्या. हॉटेल खूपच प्रशस्त होते, रूमही सुसज्ज अशा होत्या.

फ्रेश होऊन हॉटेलमध्ये dinner घेतले. Food quality खूप छान होती.

No comments:

Post a Comment