Saturday, December 11, 2021

Nainital Jim Corbett tour with Veena World भाग 5: भीमताल ते जिम कॉर्बेट प्रवास

 

27oct2021

 Nainital Jim Corbett tour with Veena World

 भाग 5: भीमताल ते जिम कॉर्बेट प्रवास

 

सकाळी लवकर उठून फ्रेश झालो. आज हे भीमताल मधील सुंदर हॉटेल सोडायचे आणि दुसरीकडे जायचे याची हुरहुर होतीच. डायनिंग हॉल मध्ये छान पैकी ब्रेकफास्ट केला. सर्व सामान पॅकअप करून रूम सोडली आणि बाहेर छान पैकी ग्रुप फोटो घेतला. यामध्ये हॉटेलचे आतिथ्यशील कर्मचारी सुद्धा होते त्यांनी आमचे व्हिडिओ फीडबॅकस् घेतले.




आम्हाला आता जायचे होते कालाढूंगी म्युझियम कडे.

 हे अंतर साधारण साठ किलोमीटरचे आहे परंतु यातील बराच रस्ता घाटाचा आहे आम्ही पावणेनऊला हॉटेलमधून निघालो आणि आम्हाला कालाढूंगी म्युझियम पोहोचायला जवळपास बारा वाजले होते. कारण काही रस्ता घाटाचा आणि धोकादायक होता. आणि नेमकेच अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे या रस्त्याने जाणे जिकिरीचे होते परंतु आमच्या बस ड्रायव्हरने खूप सफाईदारपणे बस चालवत आम्हाला सुखरूप म्युझियम पर्यंत पोहोचविले. 



या म्युझियमचे नाव जिम कॉर्बेट म्युझियम असेही होते. 

जिम कॉर्बेट हे नरभक्षक वाघ आणि त्यांच्या शिकारीच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी आणि लेखक होते. त्यांचा जन्म नैनितालला झाला होता, त्यांचे एक घर कालाढूंगी येथेही होते. तेथे हे म्युझियम आहे. 



भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून या भागाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात यावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आणि नंतर त्याचे नाव जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे झाले. त्यांचे शिकारीचे अनुभव आणि वन्यजीव याविषयीचे लिखाण त्यांनी अनेक पुस्तकांमधून केले आहे. या म्युझियम मध्ये ते वापरत असलेल्या काही वस्तू, त्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि शिकारीचे साहित्य ठेवलेले आहे.

म्युझियम बघणे झाल्यावर आम्ही बाहेर छान शिकंजी सरबत घेतले आणि काही फ्रुट्स खाल्ले त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे येथे मिळत असलेले चकोतरा नावाचे फळ. 




येथून आम्ही पुढे निघालो आमच्या हॉटेल कडे...

हॉटेल ला आम्ही 2 वाजता पोहोचलो.

हॉटेल अगदी जंगलाच्या बाजूला होते.

हॉटेलचे नाव होते-

Corbett Tuskar Trail 

हे एक रिसॉर्टच होते.



येथे राहण्यासाठी कॉटेजेस होते, स्विमिंग पूल होता, गेम झोन होते, मोठे लॉन होते. 

लंच केल्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो. येथील रुमही छानच होत्या. फ्रेश होऊन थोड्या वेळाने बाहेर निघालो. UTDC च्या शॉप मध्ये जाऊन काही खरेदी केली. तेथे गढवाल सिल्क, बनाना सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल चांगले मिळते. तिथे शेजारी adventure activity park मध्ये गेलो. Camel ride, gun shooting, climbing अशा अनेक activities तेथे असतात. 

संध्याकाळी हॉटेलला परतलो. रात्री डिनरला हॉटेलमध्ये गेलो. तिथे एक स्थानिक कलाकार विविध हिंदी गाण्यांवर बासरी वाजवीत होता. त्याचे बासरी वादन खूपच सुमधुर वाटले. 

आज रात्री लवकर झोपलो कारण उद्या सकाळी nature walk ला आणि जंगल सफारीला जायचे होते.

No comments:

Post a Comment