Sunday, December 12, 2021

Nainital Jim Corbett tour with Veena World भाग 7: दिल्लीकडे परत

 

29Oct2021

Nainital Jim Corbett tour with Veena World

भाग 7: दिल्लीकडे परत

 

या सहाव्या आणि शेवटच्या भागाचे शीर्षक लिहितानाच मनात हुरहूर वाटत आहे.

 वीणा वर्ल्ड ने घडवून आणलेली ही उत्कृष्ट सहल संपणार आहे.

सहा सात दिवसांसाठी सोबत असणारे सहप्रवासी नजरेआड होणार परंतु कायम स्मरणात राहणार आहेत.

 

आयुष्यातल्या असंख्य क्षणांपैकी

मोजके क्षण अजरामर असतात. त्यांचा खोल ठसा मनावर उठतो. शेवटी

हेच निसटते क्षण काय ते आपले असतात. बाकी सगळं आयुष्य म्हणजे

लादलेला भारा असतो. 

त्यापैकी हे काही क्षण होते.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आमच्या टूर मध्ये प्रवासी संख्या कमी होती फक्त चार कुटुंब आणि एकटे टूर मॅनेजर.  

 

पहिले कुटुंब होते पाच जणांचे.

दुसरे होते चार जणांचे.

तिसरे होते तीन जणांचे.

चौथे होते दोघांचे 

आणि 

शेवटी एकटा टूर मॅनेजर.

अशा रीतीने आमची छान गणितीय रचना झाली होती. 5-4-3-2-1




 

मीना मॅडमचे काही महिन्यांपूर्वी गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते परंतु त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सहलीचा त्यांनी पूर्ण आनंद घेतला. एवढेच काय तर स्विमिंग पूल मध्ये त्या सतत बराच वेळ पोहल्या.

 

अमोल सर म्हणजे आयटी प्रोफेशनल. खूप ब्रिलियंट माणूस. कोडी सांगणे असो अथवा PJ सांगणे असो या सर्वांमध्ये त्यांचा हातखंडा. अंताक्षरी खेळताना गाण्यांचे Database त्यांच्याकडे होते.

 

तेजस्विनी मॅडम अगदी स्पष्टवक्त्या. तसेच कोणतीही गोष्ट उत्साहाने आणि जोशपूर्ण रितीने करणार.

 

सार्थक हा ज्ञानप्रबोधिनी चा गुणी विद्यार्थी. तसेच खाना खजाना मध्ये खूप लक्ष देणारा.

 

किमया म्हणजे चिमणीच. छान खर्जातला आवाज. तिला काही गाणी, कविता पाठच. स्वाती मॅडम सोबत तर ती छान अंताक्षरी खेळत होती.

 

किरण सरांची फॅमिली गुजराथी. सध्या मुंबईला वास्तव्य.

किरण सर आणि धारा मॅडम यांना नेककडे जास्त लक्ष द्यावे लागायचे. 

विशेष म्हणजे त्यांना हिंदी, मराठी, गुजराथी सर्व भाषा छान बोलता येतात. आणि त्यामुळे नेकलाही तिन्ही भाषांतील अनेक वाक्य बोलता येतात.

या फॅमिलीनेही टूर खूप छान एन्जॉय केली.

 

नितीन सर आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात सीनियर. त्यांनीही टूर छान एन्जॉय केली. ते स्वतः पुणेकर आणि संगीताची आवड, जाण असलेले. त्यामुळे त्यांचा संगीतविषयक अनुभवांचा खजिना ही आमच्यासाठी मेजवानीच होती. गिटार शो च्या वेळी तर त्यांनी clapbox सुंदर वाजवला होता.

 

स्वाती मॅडम अखंड उत्साही व्यक्तिमत्व. त्यांचा उत्साह आम्हाला लाजवेल असा होता. अगदी त्यांनी paragliding चाही अनुभव घेतला. अंताक्षरी साठी त्यांच्याकडे दुर्मिळ मराठी गाण्यांचा खजिनाच होता.

 

आणि हो.... आमचा टूर मॅनेजर अमोल म्हणजे तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्व. वेळेचे नियोजन, नेहमी उत्साही राहणारा अमोल.

असा Born to travel असणारा अमोल या सहा दिवसांच्या भेटीमध्ये आमच्यातलाच कधी होऊन गेला हे समजलेही नाही.

 

परतीच्या प्रवासात आम्ही अंताक्षरी खेळली. मुरादाबादला श्री साईबाबा हॉटेल येथे चहा घेतला. नंतर lunch साठी गजरौला येथे बिकानेरवाला येथे थांबलो. 

सायंकाळी चार वाजता आम्ही नोएडा इथे सर्वांना बाय-बाय करून आणि पुनश्च भेटीचा निश्चय करून उतरलो. 

बाकीचे सहप्रवासी विमानतळावरून मुंबईला परतणार होते.

 

वीणा वर्ल्डने या सुंदर सहलीचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.

 

पुनरागमनायच........

No comments:

Post a Comment